बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मंत्री धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुडीपाडवा मेळावा व उत्तरसभेतील भाषणानंतर राज्यात राज ठाकरे विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असा वाद रंगला आहे. राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला मनसेकडून (MNS) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंना रामदास पाध्येंच्या अर्धवटरावाची उपमा देत डिवचलं होतं. अर्धवटराव आधी भाजपविरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे. मात्र, एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले, अशी खोचक टीका मुंडेंनी केली होती. यानंतर मनसेचे प्रवक्ते योगेश चिले (Yogesh Chile) यांनी या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे.

धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची ‘बॉबी डार्लिंग’ आहे, अशी घणाघाती टीका चिले यांनी केली आहे. आयुष्यात इतकं डार्लिंग डार्लिंग केलंय की तिच डार्लिंग आता अंगाशी आलीय, असा टोला देखील योगेश चिले यांनी लगावला आहे.

दरम्यान, छातीत कळ काय उगाच येते का?, असा खोचक सवाल देखील योगेश चिले यांनी उपस्थित केला आहे. धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंवर केलेल्या वैयक्तिक टीकेला योगेश चिले यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

धनंजय मुंडेंकडून राज ठाकरेंचा अर्धवटराव म्हणून उल्लेख, म्हणाले…

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंबाबत सरकारी वकिलांनी दिली धक्कादायक माहिती

“पक्षप्रमुख आदेश देतील आणि ईट का जवाब पत्थरसे दिया जायेगा”

महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती?, केंद्राने राज्यांना दिल्या ‘या’ सूचना

“राज ठाकरेंना फुले, शाहू, आंबेडकरांची अॅलर्जी आहे का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More