बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसेकडून ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचं स्वागत!

मुंबई | कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने हळूहळू निर्बंध शिथील करत सर्व काही चालू करण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 जुलैपासून दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल चालू होणार असल्याचं जाहीर केलं आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयाचं आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खास ट्विट करत स्वागत केलं आहे.

मुंबईची जिवनवाहिणी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन्स चालू कराव्यात, अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे करत होते. ही मागणी अखेर राज्य सराकारने मान्य केली आहे. यामुळे मनसेने सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करण्यात आलं आहे की, मुंबईकरांचे हाल थांबवण्यासाठी तसेच मुंबईचं अर्थचक्र सुरळीत चालू ठेवण्यासाठी ज्यांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत त्या लोकांना लोकलची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

आज जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल, अशी घोषणा केली आहे. जनभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे.

थोडक्यात बातम्या –

‘…तर सत्ताधारी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार’; इम्तियाज जलिल यांचा इशारा

लस घेतल्यानंतर तुम्ही ‘इतके’ दिवस सुरक्षित राहणार; एम्सच्या डाॅक्टरांनी दिली महत्वाची माहिती

काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यानं केलं मोदी सरकारचं कौतुक; काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या

‘…अन्यथा पैसे काढता येणार नाहीत’; पीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी

महाराष्ट्रातील जनतेनं उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More