मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सभांचा धडाका लावला असताना शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील त्यांच्या सभेची घोषणा केली. 14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार असून काय तो सवाल जवाब होऊनच जाऊ दे, असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
गुढीपाडवा मेळाव्यासह उत्तर सभा व औरंगाबाद येथील सभेत देखील राज ठाकरे महाविकास आघाडीवर तुटुन पडले. त्यानंतर काय ते सवाल जवाब होऊन जाऊ दे असा इशारा देत मुख्यमंत्र्यांनी सभेची घोषणा केली. या सभेपूर्वीच मनसेनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी ट्विट करत सेनेला टोले लगावले आहेत.
राजसाहेबांच्या संभाजीनगरच्या सभेला अनेक अटी, शर्ती मग शिवसेना पक्षप्रमुखांच्या टोमणे सभेला काही अटी, शर्ती आहेत का?, असा खोचक सवाल गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे. तर टोमणे सभेला शुभेच्छा म्हणत काळेंनी शिवसेनेला (Shivsena) डिवचलं आहे.
दरम्यान, आमचं सरकार आलं की मशिदींवरील भोंगे, रस्त्यावरील नमाज बंद करणार हे बाळासाहेबांचं स्वप्न हिंदुत्वाचा हुंकार म्हणत सभा घेणारे पूर्ण करणार का?, असा सवाल देखील गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.
राजसाहेबांच्या संभाजीनगरच्या सभेला अनेक अटी,शर्ती मग शिवसेना पक्षप्रमुखांच्या टोमणे सभेला काही अटी,शर्ती आहेत का ?
आमचं सरकार आल की मशिदींवरील भोंगे,रस्त्यावरील नमाज बंद करणार हे बाळासाहेबांच स्वप्न हिंदुत्वाचा हुंकार म्हणत सभा घेणारे पूर्ण करणार का?
बाकी टोमणे सभेला शुभेच्छा.!
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 12, 2022
थोडक्यात बातम्या-
गणेश मंडळाचे अध्यक्ष ते आमदार, असा होता रमेश लटकेंचा भन्नाट राजकीय प्रवास
काय सांगता! पृथ्वीराजसाठी अक्षय कुमारने घेतले तब्बल ‘इतके’ कोटी, मानधन ऐकून थक्क व्हाल
‘मी पण अयोध्येला जाणार कारण मलाही…’; गुणरत्न सदावर्तेंचं मोठं वक्तव्य
तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
मोठी बातमी! शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन
Comments are closed.