बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर काय मजा येईल ना, मुख्यमंत्री आपण राज्यभर दौरे कराल का?”

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या मानेच्या आजारपणामुळं त्रस्त आहेत. राज्य विधीमंडळाचं अधिवेशन मुंबईत चालू आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीची सर्वत्र चर्चा होत आहे. अशात सरकारनं मुख्यमंत्र्यांच्या मानेला अधिक त्रास होवू नये म्हणून वर्षा बंगला ते विधीमंडळापर्यंतचा रस्ता गुळगुळीत केला आहे. यावरूनच मनसेनं सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्री विधानसभेत जाणार असल्यामुळे वर्षा ते विधानभवन हा रस्ता खड्डे विरहित करण्यात आला. असेच मुख्यमंत्री जर राज्यभर फिरले तर काय मजा येईल ना?. प्लिज, प्लिज, प्लिज मुख्यमंत्री आपण राज्य भर दौरे कराल का?, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. परिणामी सध्या देशपांडे यांच्या या टीकेचीच चर्चा सर्वत्र होत आहे.

भाजप नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांसाठी रस्ता तयार करण्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. अशात आता मनसे मैदानात उतरली आहे. राज्यातील रस्ते पण मुख्यमंत्र्यांनी दौरा केला तर असेच गुळगुळीत होतील. जनता त्रास्त तर राजा गुळगुळीत रस्त्यावर अशी टीका मुख्यमंत्र्यांवर होत आहे. परिणामी उद्धव ठाकरे यांच्याकडून या टीकेला काय उत्तर येतं हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, एका महिन्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहेत. परिणामी त्यांच्याकडील चार्ज कोणाला तरी देण्यात यावा यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली आहे.

थोडक्यात बातम्या 

मोठी बातमी! न्यायालयाचा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दणका, आता…

‘भारतात दररोज Omicron चे 1.8 लाख रूग्ण आढळतील’; तज्ज्ञांचा धक्कादायक दावा

‘काही झालं की भाजपच्या महिला नेत्या बोंबलत सुटतात’; शिवसेना आमदाराचे बिगडे बोल

पत्रकार परिषद घेत करूणा मुंडेंचा खळबळजनक खुलासा, म्हणाल्या…

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More