बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा!

पंढरपूर | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मनसेने राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना पाठिंबा दिल्याचं कळतंय. मनसेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच मनसेचे नेते भगीरथ भालके यांचा प्रचारही करणार असल्याची माहिती आहे.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. अशात मनसेनं राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना पाठिंबा दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं आणखी जड झालं आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंढरपूरमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पंढरपूरात सभा घेतल्या होत्या.

पाच वर्षांसाठी इथल्या जनतेने भारत नानांना निवडून दिले होते, त्यांचं काम पण सुरु होतं, मात्र काळाने घाला घातला. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांनी भगीरथ भालकेला विधानसभेत पाठवायचे आहे. भगीरथ भालके यांनी भारत नानांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करावे, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सर्व ताकद लावीन, असं अजित पवार म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

“उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन केला तर काय कराल?”

त्याने भररस्त्यात तिच्यावर 25 वेळा चाकूनं केले वार; दिल्लीतील घटनेनं देश हादरला, पाहा व्हिडीओ

कोरोनाने मृत्यू झालेल्या वडिलांचा मृतदेह स्वीकारण्यास मुलाने दिला नकार; मुस्लीम तरुणाने दिला अग्नी 

खळबळजनक! पत्नीने तीन कोटींच्या विम्याच्या हव्यासापोटी पतीसोबत केलं धक्कादायक कृत्य

धक्कादायक! शिवसेनेच्या रणरागिणीचं कोरोनामुळे निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More