महाराष्ट्र मुंबई

आम्ही सदैव राज ठाकरेंच्या सोबत; मनसैनिकांचा सोशल मीडियावर ट्रेंड

मुंबई |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विधानसभेच्या तोंडावर आज सकाळी ईडीने कोहिनूर प्रकरणी नोटीस धाडली आणि अपेक्षेप्रमाणे मनसे नेत्यांसह आणि कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार आसूड ओढले. सोशल मीडियावर ISupportRajThackeray नावाने मनसैनिकांनी राज यांना पाठिंबा दर्शवत ट्रेंड चालवला आहे.

MnsAdhikrutaNashik या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून राज्य सरकारला राज यांना नोटीस पाठवल्याप्रकरणी विविध प्रश्न विचारले गेले आहेत. राज यांनी EVM आंदोलन पुकारले म्हणूनच त्यांच्यावर तुम्ही ही कारवाई करत आहात, असा आरोप मनसेने सरकारवर केला आहे.

देशातील प्रादेशिक अस्मितांचा आवाज राज ठाकरे बनतायेत… EVM च्या गैरवापरातून निरंकूश सत्ता कशी मिळवली जाते हे जनतेला त्यांनी सांगितल्यामुळे… अबकी बार अराजक सरकार हे ओरडून सांगितल्यामुळे राज ठाकरेंना ईडीची नोटीस आली…! असं असेल तर आम्ही सदैव राज ठाकरेंच्या सोबत आहोत, अशा भावना मनसैनिकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे आणि अनिल शिदोरे यांनी राज्य सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Media by mnsadhikrutnashik

महत्वाच्या बातम्या-

-अब्दुल सत्तारांमुळे माझा विजय पक्का- अंबादास दानवे

-शिवसेना नेते विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका

-या प्रमुख आश्वासनासह प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा जाहीरनामा केला प्रसिद्ध!

-तुमची चूक नसेल आणि नोटीशीत काही तथ्य नसेल तर घाबरू नका- गिरीश महाजन

-पूरग्रस्तांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महेश लांडगेंनी घेतला स्तुत्य निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या