Top News

लोकसभेप्रमाणेच राज ठाकरेंचा विधानसभा पॅटर्न! बैठकीत मोठा निर्णय??

मुंबई |  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचाच पॅटर्न वापरण्याचं ठरवलेलं दिसतंय. लोकसभेप्रमाणेच विधानसभाही न लढण्याचा सूर मनसेच्या बैठकीत ऐकायला मिळाला.

विशेष म्हणजे स्वतःकडचे पैसे जपून वापरा. देशाची आर्थिक स्थिती यापुढे अत्यंत बिकट होईल, असा सल्लाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती कळती आहे. देशाच्या कठीण आर्थिक परिस्थितीत निवडणूक लढवणेही कठीण असल्याचं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी बैठकीत केल्याची माहिती आहे.

राज ठाकरेंच्या म्हणण्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील राज ठाकरे यांच्या म्हणण्याला अनुकुलता दर्शवली आणि त्यांच्या सुरात सुरात मिसळल्याची माहिती आहे.

दरम्यान, निवडणूक लढायची झाल्यास मनसेच्या उमेदवारांना पक्षाकडून आर्थिक पाठबळ मिळणं कठीण असल्याचं यातून स्पष्ट झाल्याचं बोललं जातंय.

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या