बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वरूण सरदेसाई यांना ‘सरकारी भाचा’ घोषित केलंय का?”

मुंबई | सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेेने आक्रमक भूमिका घेत नारायण राणे यांच्या विरूद्ध आंदोलन केलं. युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्यात नेतृत्वाखाली काल मुंबईतील जुहूमध्ये आंंदोलन करण्यात आलं. त्यावेळी शिवसेना कार्यकर्ते आणि राणे समर्थक आमने सामने आले होते. त्यावेळी वरूण सरदेसाई यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावरून आता मनसेने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मनसे नेते अखिल चित्रे यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्र लिहित ठाकरे सरकारला 8 प्रश्न विचारले आहेत. सामाजिक कार्यक्रमांवर, मराठी सणांवर जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर होणारी आंदोलनांवर बंदी असताना ‘सरकारी भाचा’ कार्यकर्ता मेळावा कसा घेऊ शकतो?,असा सवाल मनसेने पत्रातून उपस्थित केला आहे. सरकारी आदेशांचं उल्लंघन केलं म्हणून वरुण सरदेसाई  यांच्यावर गुन्हा दाखल का होऊ नये?, असही या पत्रात म्हटलंय.

वरूण सरदेसाई यांच्याकडून बंधपत्र का लिहून घेऊ नये? जनतेवर कोरोनाचं खापर फोडणारं सरकार ‘सरकारी भाच्या’वर इतकं उदार का?, असा खोचक सवाल देखील मनसेने विचारला आहे. वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारं हे सरकार बेशिस्त भाच्याचा बंदोबस्त करणार का?, असंही या पत्रातून मनसेने विचारलं आहे.

दरम्यान, राजकीय हेव्यादाव्यांसाठी सरकारी भाच्याकडून आंदोलनं करताना गर्दी जमवली जाते, पोलिसांना आणि त्यांच्या भगिनींना अत्यंत घाणेरड्या आवेशात शिवीगाळ केली जाते, असा आरोप देखील मनसेेने या पत्राद्वारे केला आहे.

पाहा पत्र-

थो़डक्यात बातम्या-
राज्यात आता राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग – नितेश राणे

देवेंद्र फडणवीसांच्या चुलत भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन!

मोठी बातमी- ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने केली मोठी घोषणा

“शरजील उस्मानीला आणला का शोधून पाताळातुन?”

राणेंच्या अटकेनंतर भाजप आक्रमक, उद्धव ठाकरेंचं ते वक्तव्य शोधलं, राडा होणार!

“सत्तर वर्षांची कमाई मोदींनी विकून टाकली”, पाहा राहूल गांधींचा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More