मुंबई | शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदेच्या बंडामुळे अडचणीत आलेल्या शिवसेनेची मनसेने खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे चांदीवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी शिवसेनेला बॅनर्सच्या माध्यमातून डिवचलं आहे.
बॅनर्सवर त्यावेळी माझ्या राजसाहेबांचे नगरसेवक फोडलेत, आता कसं वाटतंय?, असा प्रश्न विचारला आहे. मी राजनिष्ठ कार्यकर्ता आहे. मी राजभक्त आहे. म्हणून मला वाटलं की त्यावेळी जे आम्हाला सातत्याने सांगत होते की सहा नगरसेवक गेलेत तर मनसे संपली. पण तुम्ही जे पेरणार तेच उगवणार आहे, असंही ते म्हणालेत.
काही दिवसांपूर्वी एकच बातमी चालायची की आम्ही खरे हिंदूत्व ते खोटे हिंदूत्ववादी. पूर्ण भारताने राज ठाकरेंच्या रुपाने कट्टर हिंदूत्ववादी नेता पाहिला. मात्र आज कशी परिस्थिती झालीय की तुमचेच आमदार सांगतायत तुम्ही हिंदूत्व सोडल्याने आम्हाला इथं जावं लागलं आहे.
सगळ्यांना माहिती पडलं की खरा हिंदूत्ववादी नेता राज ठाकरे आहेत, असंही भानुशाली म्हणालेत.
मी एकनाथ शिंदेंना एवढं सांगणार आहे की, आमदार घ्या पण तपासून घ्या. नाहीतर असं होणार आमच्याकडून फायदा नाही झाला म्हणून ते शिवसेनेत गेले, असंही त्यांनी म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
“…त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचा फायदा घेत स्वार्थ साधला”
“बेताल वक्तव्य करणारे कोण हे सर्वांनाच माहिती, इथे धमकीला कोणी घाबरत नाही”
उद्धव ठाकरेंना काळजी नाही कारण त्यांना माहितीये ‘त्यावेळी’ इंदिरा गांधी अजिंक्य राहिल्या!
‘तुम्ही फक्त सतरंज्या झटका’, महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर इंदुरीकर महाराज स्पष्टच बोलले
शिवसेनेला आणखी एक झटका, ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची कारवाई
Comments are closed.