बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“याला म्हणतात ठाकरे ब्रँड; राजसाहेबांचं पत्र गेल्यावरच आली हाफकिनची परवानगी”

मुंबई | केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. ही परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील मानले होते. आता मनसेने लस उत्पादनाची परवानगीचं श्रेय राज ठाकरे यांना दिलं आहे.

राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिनला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्यांची परवानगी राजसाहेबांचं पत्र गेल्यावर आली. याला म्हणतात “ठाकरे ब्रँड”. करोना काळात “राजकारण” नको म्हणणाऱ्यांनी आभार मानायला हरकत नव्हती, असं मनसे नेते संदिप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने ही परवानगी दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानलेत. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळाल्यास आपण एकत्रितपणे या संकटावर मात करु, असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, याआधी राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं होत. यात त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह पाच मागण्या केल्या होत्या. यामध्ये लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती.

थोडक्यात बातम्या-

उच्चशिक्षित आईनं 6 महिन्यांच्या चिमुकलीसोबत केला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार!

“पोलिसांना मदत करा, त्यांना चहा, पाणी किंवा शक्य असल्यास जेवणही द्या”

…तर मागच्या सारखा कडक लॉकडाऊन लावावा लागेल- अजित पवार

दीपक चहरच्या गोलंदाजीपुढे पंजाबचे खेळाडू ढेर; चेन्नई सुपर किंग्सचा पंजाबवर 6 विकेट्सने सहज विजय

“BMC ने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर द्यावेत, बेड मिळण्यात अडचण येऊ देऊ नका”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More