महाराष्ट्र

अ‍ॅमेझॉनला धडा शिकवल्यानंतर आता मनसेने आपला मोर्चा डॉमिनोजकडे वळवला!

मुंबई | अ‍ॅमेझॉननंतर मनसेनं आपला मोर्चा डॉमिनोजकडे वळवला आहे. डॉमिनोजच्या अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध नाही. तसा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी मनसेनं केली आहे.

मनसेने मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये अ‍ॅमेझॉनची कार्यालये आणि गोदामांची तोडफोड करण्याचा सपाटा लावला होता. मनसेच्या या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनने शरणागती पत्कारत सात दिवसांत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिलं होतं.

हा सर्वप्रकार पाहता डॉमिनोजने अगोदरच मनसेसमोर शरणागती पत्कारल्याचे चित्र दिसत आहे. अ‍ॅमेझॉन, स्विगी , झोमॅटो नंतर आता डोमिनोजच्या जुबिलियन्ट फूड वर्क कंपनीनेदेखील आपल्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसेने अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. सुरुवातीला मनसेने पत्रं इशारे आणि बॅनरबाजीच्या माध्यमातून या मुद्द्याचा पाठपुरावा केला. मात्र, अ‍ॅमेझॉनने याविरोधात न्यायालयात धाव घेत राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यानंतर मनसे प्रचंड आक्रमक झाली होती.

थो़डक्यात बातम्या-

ग्रामपंचायत निवडणुकीची ‘ही’ पद्धत लोकशाहीला घातक- हसन मुश्रीफ

सरकारला कंटाळून डीजीपींनी प्रतिनियुक्तीवर जाणं भूषणावह नाही- देवेंद्र फडणवीस

पुणेकरांच्या आनंदावर विरजण; रात्री 11 नंतर मिळणार नाही खाद्यपदार्थांची घरपोच डिलिव्हरी

मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे भव्य कलादालन साकारा- उद्धव ठाकरे

राज्यातील लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या