बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसेच्या दहीहंडीला 100 टक्के नाचायला येणार – प्रविण तरडे

मुंबई | कोरोनाच्या महामारीनं मागील गेल्या वर्षापासून सण-उत्सव रद्द करण्यात येत आहेत. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून सरकारनं सूचना जारी केल्या होत्या. मात्र यावर्षी कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यानं आणि लसीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दहीहंडी साजरी होणार असल्याचं जाहीर केलं आहे. अशातच आता यावर प्रविण तरडेंनी कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या थैमानानं दहीहंडी साजरी झाली नाही. मात्र यावर्षी विश्वविक्रमी दहीहंडी 31 ऑगस्टला होणार, अशी पोस्ट मनसे नेते अभिजित पानसे यांनी केली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहीहंडी उत्सवात सामील होण्यासाठी एकत्र या आणि आपला मराठी सण साजरा करा, असं आवाहनही अभिजित पानसे यांनी केलं आहे.

अभिजित पानसेंच्या पोस्टवर आनंद व्यक्त करत अभिनेता प्रविण तरडे यांनी ‘100 टक्के नाचायला येणार’ असं म्हटलं आहे. त्याची कमेंट पाहताच त्यांच्या चाहत्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका टळला नाही. त्यामुळे कोरोनाच्या नियमाचं काटेकोरपणे पालन करण्यास सांगतिलं जात आहे. कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी लसीकरणावरही भर दिला जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

“देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने मराठा समाजाचे कैवारी आहेत”

राज्यांना ‘इतक्या’ कोटी लसींचे डोस दिले; केंद्र सरकारने जाहीर केली आकडेवारी

चीनमध्ये आढळला आणखी एक नवा व्हायरस; एका रूग्णाच्या मृत्यूने खळबळ

“केंद्र सरकारकडे स्वत:चं कौतुक करणारी आकडेवारी आहे, आणि तिच एक दिवस देशाला बुडवू शकते”

ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत, त्यांच्यासाठी मुंबई लोकल तातडीने सुरु करा- राज ठाकरे

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More