महाराष्ट्र मुंबई

‘तीने मला घरी नेलं आणि माझ्यासोबत…’; मनसेच्या मनिष धुरींनी दिली धक्कादायक माहिती

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात आरोप करणाऱ्या रेणू शर्माने मनसे नेते मनीष धुरी यांनाही फोन करुन, जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी केला. यानंतर या प्रकरणावर आता खुद्द मनीष धुरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

म्युझिक अल्बम तयार करण्यासाठी मदत करा म्हणून रेणू शर्मा संपर्कात आल्याचं मनीष धुरी यांनी सांगितलं आहे.

रेणू शर्मा एकदा मला आपल्या दीदीला भेटण्यासाठी घरी घेऊन गेली होती, पण घरी ती एकटीच असून, अश्लील चाळे करायला सुरुवात केली. पण मी यातून कसा तरी बाहेर निघालो, त्यामुळे मी वाचलो, असं मनीष धुरींनी सांगितलं आहे.

घडलेल्या प्रकारानंतर मी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. तिचा फोन न घेणे, अशा बऱ्याच गोष्टी मी केल्या. त्यानंतर मला समजले की, ती आणि तिची बहीण दोघी मोठमोठ्या उच्चभ्रू लोकांशी मैत्री करतात, त्यानंतर फसवून त्यांच्याकडून पैसे उकळतात. खंडणी काढण्याचा प्रयत्न करतात. तरीही आपण रेणू शर्मांवर फसवणुकीच्या कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा ही विनंती, असं मनीष धुरी यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रत्येक गोष्टीसाठी लढणाऱ्या महिलांना कधीही कमजोर समजू नका- पंकजा मुंडे

नवाब मलिक मंत्री आहेत म्हणून जावयाने काहीही करावं का?- सुधीर मुनगंटीवार

कृष्णा हेगडेंच्या आरोपांनंतर रेणू शर्मानं मौन सोडलं; केला मोठा खुलासा

धनंजय मुंडेच नव्हे तर ‘या’ व्यक्तिविरोधातही रेणू शर्मानं तक्रार केल्याचं उघड

धनंजय मुंडे प्रकरणात आता व्हिडीओ क्लिप्स; पीडितेच्या वकिलाचा धक्कादायक दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या