बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”या’ तारखेपर्यंत मनसेच्या कार्यालयात आला नाहीस तर….’; मनसेचा साहिल खानला अल्टिमेटम!

मुंबई | सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर मनोज पाटीलने 2016 मध्ये मिस्टर इंडिया मेन्स फिजिक ओव्हरऑल चॅम्पियनशिपचा किताब जिंकला. तेव्हापासून मनोजला देशात ‘मिस्टर इंडिया’ या नावाने ओळखलं जात आहे. अलिकडेच मनोज पाटीलने विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बॉलिवुड अभिनेता सोहेल खान याच्या त्रासाला कंटाळून मनोजने टोकाचं पाऊलं उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

बॉलिवुड अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतोय, तो माझ्या न्युट्रिशन शॉपविषयी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अपप्रचार करत आहे, तसेच माझं करिअर संपवण्याची धमकी देतो, असा आरोप मनोजने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. त्यानंतर मनोजने 16 सप्टेंबर रोजी विषारी गोळ्या खाऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. यावर मनसेने संताप व्यक्त करत या प्रकरणात उडी घेतली आहे.

20 सप्टेंबरला साहिल खान मनसेच्या कार्यालयात आला नाही, तर त्याला त्या पद्धतीचा इशारा देण्यात येईल, असं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे. बॉडी बिल्डर मनोज पाटील याला न्याय नक्की मिळेल, असा विश्वासही देशपांडे आणि खोपकरांनी व्यक्त केला आहे.

16 सप्टेंबरच्या रात्री उशिरा मनोजला मंबईतील कपूर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  आता त्याची तब्येत स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.  मात्र आत्महत्येस प्रवृत्त करण्यास साहिल खान जबाबदार आहे, असा आरोप मनोजच्या कुटुंबियांनी केला आहे. साहिल खान हा चित्रपट अभिनेता, फिटनेस उद्योजक आणि युट्युबर आहे. त्याच बरोबर तो फिटनेसबाबत जागरूकता वाढवण्यासाठी तो ओळखला जातो. साहिल खान हा मनोजच्या नेहमी जवळ असायचा.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून गडकरींनी आपल्या सासऱ्यांच्याच घरावर चालवला बुलडोझर; कार्यक्रमात सांगितला ‘तो’ खास किस्सा

‘भाजपमध्ये दरेकरांसारख्या नेत्यांचा….’; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच सुरेखा पुणेकर कडाडल्या!

महाविकास आघाडी सरकार पडणार? चंद्रकांत पाटलांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी! भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा रद्द; आलं ‘हे’ मोठं कारण समोर

पोस्ट ऑफिसमध्ये ‘हे’ खातं असेल तर मिळेल 2 लाखांचा फायदा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More