बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अशावेळी आर. आर. पाटील असते तर…’; मनसुख हिरेन प्रकरणावर मनसेची प्रतिक्रिया

मुंबई | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारला चांगलंच कोंडीत पकडण्यात आलं आहे. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना त्वरित निलंबित करण्यात यावं, अशी मागणी गेल्या दोन दिवसांपासून भाजपकडून केली जात असताना आता मनसेनंही या पार्श्वभूमीवर सरकारला टोला लगावला आहे. तसेच लोकहिताच्या प्रश्नांवर विधानसभेत कसलीही चर्चा केली जात नाही, अशी टीकाही मनसेनं केली आहे.

सरकारच्या चुका लक्षात आणून देणं हे विरोधकांंचं कामच आहे. आर. आर. पाटील पदावर असताना आमचं म्हणणं योग्य असेल तर संबंधितांवर त्वरित कारवाई करायचे, असा अप्रत्यक्ष टोला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगावला आहे.

सचिन वाझे यांनी सत्याचा स्विकार करून आपला राजिनामा द्यायला हवा,  तसेच सभागृहाचे कामकाज अशा कामावरून बंद पाडणं योग्य नसून विधानसभेत केवळ अंबानी आणि सचिन वाझे प्रकरणावरच चर्चा होते. लोकहिताच्या प्रश्नांवर कसलही काम होत नाही, अशी टीकाही नांदगावकर यांनी यावेळेस केली आहे.

दरम्यान मनुसख हिरेन प्रकरणात विरोधकांच्या सभागृहातील गदारोळानंतर राज्य सरकारने सचिन वाझे यांना गुन्हे शाखेतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधानपरिषदेत यासंदर्भातील घोषणा केली आहे. मात्र सरकारला घेरण्यासाठी देशमुख यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंग प्रस्तावही आता सभागृहात दाखल केला आहे.

थोडक्यात बातम्या –

‘या’ कारणाने पतीकडून पत्नीचा निर्घृण खून; सहा महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह

महिलांवरील शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराबाबत अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर

देवेंद्र फडणवीसांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात हक्कभंग दाखल!

‘ही माझी मोठी चूक’; राहुल गांधींच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण

दुसरं लग्न लावून देत नाही म्हणून 60 वर्षांचे आजोबा चढले विजेच्या खांबावर, अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More