बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पवारांच्या बालेकिल्ल्यासाठी मनसेची रणनीती; पुण्यातील ‘फायर ब्रँड’ नेते वसंत मोरेंवर मोठी जबाबदारी

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) आगामी निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. विशेषत: पुण्यात यासाठी जोरात प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. पवार कुटुंबाच्या बालेकिल्ल्यात मनसेने मोठी रणनीती आखली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thakrey) मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यांवर भाष्य केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळुन निघालं होतं. याच कारणावरुन पुण्यातील फायर ब्रँड नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली दिसली. मात्र आज राज ठाकरे यांनी वसंत मोरेंवर एक महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ निरीक्षक पदी मोरेंची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक झाली. यादरम्यान राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला.

मोरेंकडे आता थेट सुप्रिया सुळेंच्या मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण  आले आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More