Top News महाराष्ट्र मुंबई

अ‍ॅमेझॉनला दणका दिल्यानंतर मनसेने पश्चिम रेल्वेला दिला हा इशारा!

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मराठीच्या मुद्यावर अ‍ॅमेझॉनला दणका दिल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवला आहे.

पश्चिम रेल्वेने माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणी मनसेनं केली आहे.

पश्चिम रेल्वेकडून विविध माहिती पत्रके, जाहिराती प्रसिद्ध होत असतात. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही माहिती दिली जाते. पण यामध्ये सर्व पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर केला जात नाही. केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांनुसार भाषाही वापरणं बंधनकारक केलं आहे, पण असं असतानाही मराठी भाषेचा वापर केला जात नाही, असा आक्षेप मनसेनं घेतला आहे.

मराठी भाषेचा वापर सुरू करणेबाबत आग्रह आहे. पण, त्याची दखल घेतली जात नसून अजूनही संबंधित अधिकारी मुजोरी करत आहे, असा आरोपही मनसेनं केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

भारतात पहिल्या टप्प्यात ‘इतक्या’ लाख लोकांचे लसीकरण होणार

“…तरीही पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचं कौतुक”

“भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवार यांना संधी द्या”

नव्या वर्षात देशासाठी ‘हा’ संकल्प करा- नरेंद्र मोदी

एसटीचा प्रवास आता होणार अधिक वेगवान; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या