देश

पुस्तकं दुकाने, पंख्यांची दुकाने सुरू होणार तसंच मोबाईल रिचार्ज करता येणार

नवी दिल्ली |  अत्यावश्यक सेवा वगळता केंद्र सरकारने इतर नागरिकांना बाहेर पडण्यास सक्त मनाई केली आहे. केंद्र सरकारने आता यामध्ये आणखी थोडी सूट दिली आहे. पुस्तकं दुकाने, पंख्यांची दुकाने आता सुरू ठेवता येणार आहेत.

सध्या उन्हाळ्याचे दिवससुरू असल्याने आणि गरमी वाढू लागल्याने पंख्यांची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ज्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या बँकेतील खात्यांचं काम करणारे आणि देखभालीसाठी आवश्यक असलेल्या सेवांना सूट देण्यात आली आहे.

लॉकडाऊन कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा म्हणून पुस्तकांची दुकाने देखील सपरू राहणार आहेत. तसंच  मोबाइल प्रीपेड रिचार्जची दुकानंही सुरु राहतील. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली.

पीठाच्या गिरण्या, ब्रेडचे कारखाने सुरू ठेवण्यास देखील केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवावी, असं पत्रही गृहमंत्रालयाने राज्यांना पाठवलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या