टीव्ही, मोबाईल महाग; प्रत्येक बिलावर 1 टक्के अधिभारसुद्धा!

नवी दिल्ली | टीव्ही आणि मोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या कस्टम ड्युटीमध्ये मोठी वाढ करण्यात आलीय. परिणामी या वस्तूंच्या किंमती चांगल्याच वाढणार आहेत.

नरेंद्र मोदी सरकारने मेक इन इंडियाचा नारा दिलाय. त्यामुळे आयात वस्तूंचा कर वाढवण्याचे संकेत त्यांनी अर्थसंकल्पापूर्वीच दिले होते. त्यानूसार या वस्तूंच्या कस्टम ड्युटीत वाढ करण्यात आलीय. 

दरम्यान, मोदी सरकारने शिक्षण आणि आरोग्य अधिभारात 1 टक्क्याची वाढ केलीय. त्यामुळे आता तुम्ही काहीही खरेदी केलं तरी त्यावर 1 टक्के अधिक रक्कम द्यावी लागणार आहे.