बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भररस्त्यात डान्स केल्यामुळे माॅडेलवर गुन्हा दाखल, पाहा व्हिडीओ!

मुंबई | रोज अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पाहायला मिळतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे बरेच लोक प्रसिद्धी झोतात येत असतात. मात्र या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमुळे अनेकांना संकटांचा देखील सामना करावा लागत असतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरला याचा चांगलाच फटका बसला आहे.

व्हायरल होणारा व्हिडीओ इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर श्रेया कालराचा आहे. या व्हिडीओमध्ये ती भररस्त्यात झेब्रा क्रॉसिंगवर डान्स करताना दिसत आहे. दरम्यान तिच्या या अचनाकपणे डान्स करण्यामुळे रस्त्यावरील नागरिकही काही वेळासाठी गोंधळून गेलेले पाहायला मिळाले. पब्लिक ट्रेण्डसाठी दिलेल्या डेअरचा हा भाग असल्याचं त्या व्हिडीओमध्ये तीनं लिहिलं आहे.

श्रेयाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी तिच्यावर निशाणा साधल्याचं तिला ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं. वाहतूक थांबवून रस्त्यावर नाचल्याबद्दल श्रेयाला नेटिझन्सनी फटकारलं. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, श्रेयानं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटलं की, रहदारीचे नियम मोडण्याचा आपला हेतू नव्हता. कृपया वाहतुकीचे नियम मोडू नका. लाल चिन्हाचा अर्थ असा आहे की तुम्हाला सिग्नलवर थांबावं लागेल, मी नाचत आहे म्हणून थांबू नका आणि तुमचे मास्क घाला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Kalra (@shreyakalraa)

 

थोडक्यात बातम्या – 

मोदी हे मोदी आहेत, त्यांच्या तोडीचा आज दुसरा नेता देशात दिसत नाही- संजय राऊत

“माझ्या कानावर आलंय, चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार”

‘लस घेतली तर ब्रेकअप करेल’, गर्लफेंडला बाॅयफ्रेंडची अजब धमकी

“महाविकास आघाडीने मित्रपक्षांचा विचार न केल्यास आम्ही…”

मोदीजींच्या वाढदिवशी #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस ट्रेडिंगमध्ये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More