बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तर मी प्रत्येक रशियन सैनिकासोबत सेक्स करेन”

मुंबई | रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. रशियाकडून होत असलेले बॉम्ब हल्ले, मिसाईल हल्ले यामुळे युक्रेन हादरलं आहे. रशिया आणि युक्रेनचं युद्ध कसं थांबवावं असा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे. संपूर्ण जगाची चिंता वाढली असताना हे युद्ध रोखण्यासाठी एका मॉडेलने अनोखी शक्कल लढवली आहे.

युद्ध रोखण्यासाठी एका मॉडेलने चक्क रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सैन्यासोबत संबंध ठेवण्याची ऑफर दिली आहे. जर रशियन सैनिकांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षाचे आदेश नाकारले व ते युक्रेनमधून परतले तर मी प्रत्येकासोबत सेक्स करेन, अशी अजब ऑफर या मॉडेलने दिली आहे.

ट्विटर युजर बॅड किट्टीचे इन्स्टाग्राम आणि अडल्ट साईट ओनली फॅन्सवर लिली समर्स (lilly summers) नावाने अकाऊंट आहे. ‘डेली स्टार’च्या रिपोर्टनूसार या मॉडेलने युद्ध थांबवण्यासाठी रशियन सैनिकांना सेक्सची ऑफर दिली आहे.

दरम्यान, माझं ट्विट म्हणजे फक्त या युद्धाकडे लक्ष वेधण्यासाठी होतं. यापेक्षा जास्त काहीही समजणं म्हणजे मुर्खपणा असल्याचं या मॉडेलने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे. तर मी कोणासोबतही झोपणार नसल्याचं या मॉडेलने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“आता मी आलोय, तुमच्या प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय राहणार नाही”

Corona : वनस्पतींपासून बनवण्यात आलेल्या ‘या’ लशीला सरकारची मान्यता

“संजय तू पुरावे देच, मी पण तुझ्या नेत्यांच्या कारनाम्याची लिस्ट ईडीकडे पाठवतो”

सर्वात मोठी बातमी; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण

“मी पुन्हा सांगतो, बाप-बेटे जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More