बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आधुनिक महिलांना नको असतं मुल’; भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळं

बंगळुरू | आजच्या काळात सर्व क्षेत्रावर आधुनिकतेचा प्रभाव आहे. या आधुनिकतेच्या झपाट्यात आज शहरापासून गावं सुद्धा आली आहेत. सर्व स्तरातील नागरिक आज आधुनिकतेच्या प्रभावात जगत असतात. पाश्चिमात्य संस्कृतीचा आपल्या संस्कृतीवर वाईट प्रभाव होतोय, अशी ओरड आपण सतत ऐकत असतो. आताही कर्नाटकच्या मंत्र्यांनी महिलांबाबत असंच अजब वक्तव्य केलं आहे.

आधुनिक महिलांना एकटं राहायची इच्छा असते आणि त्यांना मुल नको असतं, असं कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर म्हणाले आहेत. सुधाकर यांच्या या वक्तव्यानंतर बराच गदारोळ माजण्याची शक्यता आहे. लग्नानंतरही महिलांना मुल जन्माला घालण्याची इच्छा नसते. त्या स्वतंत्र राहण्यावर जास्त भर देतात, असंही यावेळी के. सुधाकर म्हणाले आहेत.

जागतिक मनस्वास्थ दिनानिमित्त सुधाकर एका कार्यक्रमात बोलत होते. आपल्या संस्कृतीत आणि पाश्चिमात्य संस्कृतीत फरक आहे. आपल्या महिलांना मुल नको वाटत आहे आणि नंतर त्या सरोगसीकडं वळत आहेत, असंही सुधाकर म्हणाले आहेत. भारतीय महिलांच्या या वागणुकीला फक्त पाश्चिमात्य संस्कृती जबाबदार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुधाकर यांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्त्य संस्कृतीचा मुद्दा चर्चेत आला आहे. भारतीय महिलांना नेहमीच पाश्चिमात्त्य संस्कृतीवरून टोमणे मारले जातात. आता तर थेट आरोग्यमंत्रीच या गोष्टींवर बोलल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

भाजपचा ‘हा’ बडा नेता करणार मराठवाड्यासाठी 72 तास अन्नत्याग आंदोलन

“आवाज दाबण्याचं काम जर होत असेल तर..”; अशोक चव्हाणांचा मोदी सरकारला इशारा!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विजपुरवठ्याबाबत चिंता वाढवणारी माहिती आली समोर

देश वीजपुरवठ्याबाबत मोठ्या संकटात जाऊ शकतो- मनिष सिसोदिया

खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More