Modi 3.0 Budget 2024 Expectations | एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर मोदी सरकारमध्ये अर्थमंत्रालयाची जबाबदारी पुन्हा एकदा निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांच्याकडे देण्यात आली. मोदी सरकारची ही तिसरी टर्म सुरू आहे. आता सर्वांना अर्थसंकल्पाची आतुरता आहे. यंदा अर्थसंकल्प 22 जुलै रोजी सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2024 च्या अर्थसंकल्पात भारतातील आयकर रचनेत सुधारणांचा समावेश अपेक्षित आहे. याचबरोबर शेतकऱ्यांसाठी देखील मोठे निर्णय घेतले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एका प्रसिद्ध अहवालात यंदा आयकरात सवलत मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पीएम शेतकरी सन्मान योजनेत निधी वाढवणार?
याचा फायदा हा 5 लाख ते 15 लाख उत्पन्न असणाऱ्यांना होईल. सध्या या वर्गाला 5 ते 20 टक्के आयकर द्यावा लागत आहे. यामुळे या कररचनेत बदलाची अपेक्षा असणार आहे. यंदा सरकार (Modi 3.0 Budget 2024 Expectations) पीएम शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन रकमेत वाढ करण्याचाही विचार करत असल्याची माहिती आहे.
सध्या शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत सरकार दरवर्षी 6 हजार रुपये म्हणजेच दर चार महिन्यांनी 2000 रुपये देते. हीच रक्कम आता वार्षिक 8,000 रुपये केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे महिला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य वाढवू शकते.
कर सवलतीमध्ये बदल होणार?
दरम्यान, यंदा कर सवलतीमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोदी सरकारने 2020 च्या अर्थसंकल्पात नवीन आयकर योजना आणली होती. यामध्ये 7 लाखांपर्यंत उत्पन्नावर कोणताही कर लागत नव्हता. मात्र, यामध्ये कोणत्याही प्रकारची कर सवलत नव्हती. आता 80C मधील सवलती वाढण्याचा (Modi 3.0 Budget 2024 Expectations) विचार सुरु असल्याची माहिती आहे.
News Title- Modi 3.0 Budget 2024 Expectations
महत्वाच्या बातम्या-
रिसेप्शनसाठी सोनाक्षीने घातली तब्बल ‘इतक्या’ लाखांची साडी; किंमत ऐकून थक्क व्हाल
“येत्या दोन दिवसांत राज्याला हादरवून सोडणारा खुलासा करणार”; बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
पुणे ड्रग्जच्या विळख्यात, सोशल मीडियावर ड्रग्ज तयार करतानाचा व्हिडीओ व्हायरल!
पुण्यात ड्रग्ज प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया