“मोदी अदानी भाई- भाई”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून विरोधकांनी भाजपला(BJP) चांगलंच धारेवर धरलं होतं. आता या सगळ्याला अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) बुधवारी उत्तर दिलं होतं.

मोदींनी बुधवारच्या भाषणात अदानी प्रकरणावर कोणतंही भाष्य केलं नाही. याच मुद्द्याला लावून धरूत गुरूवारी मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी ‘मोदी अदानी भाई-भाई’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. अदानी प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात आली आहे.

मोदींनीही यावेळी विरोधकांना टोला लगावला. मोदी म्हणाले की, तुम्हीही कितीही चिखल फेका कमळ चिखलातच चांगलं फुलतं. अशा प्रकारे गुरूवारी लोकसभेत अदानी प्रकरणाचा मुद्दा चांगलाच गाजल्याचे दिसून आले.

अधिवेशनादरम्यान मोदींनी सेक्युलॅरिझमचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विविध सरकारनं ज्या काही योजना आणल्या आहेत, त्या संबंधितांपर्यंत पोहचत आहेत की नाही, हे ठरवण्याचं काम सेक्युलॅरिझम करत असतो, असंही मोदी म्हणाले.

दरम्यान, विरोधकांनी ईडीचे आभार मानले पाहीजेत कारण ईडीने त्यांना समान व्यासपीठावर आणण्याचं काम केलं आहे. निवडणुकांचे निकाल जे करू शकले नाहीत ते ईडीने केले, असा टोला मोदींनी बुधवारी विरोधकांना लगावला होता.

महत्त्वाच्या बातम्या-