बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोनामुळे आपण जवळची माणसं गमवलीत’; डॉक्टरांशी संवाद साधताना मोदी झाले भावूक

नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले प्राण गनवावे लागले आहेत. कोरोनाने काहींची कुटुंबच्या कुटुंब संपवली आहेत. तर काहींच्या जवळच्यांना कोरोनाने आपलं शिकार केलं. जवळचा माणूस गेल्यावर काय दु:ख होतं प्रत्येकाला माहित आहे. अशाच प्रकारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही भावूक झालेले पाहायला मिळालं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधील डॉक्टरांशी संपर्क साधला. या संवादावेळी मोदी भावूक झाले. कोरोनांशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावलं, असं नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी मोदींना डॉक्टरांशी बोलताना मोदींचा हुंदका आलेला व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

मी काशीचा सेवक या नात्याने सर्व काशीवासियांचे आभार मानतो. विशेष करुन आमचे डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांनी जे काम केलं आहे, ते अतुलनीय आहे. या व्हायरसने आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्यापासून हिरावलं. मी त्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करतो, असं मोदी म्हणाले.

दरम्यान, आपण कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालो, पण आपल्याला आता वाराणसी आणि पूर्वांचलमधील गावांवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. आता आपल्याला “जहाँ बीमार, वही उपचार” या मंत्राने काम करावं लागेल, असा मंत्र मोदींनी सांगितला. यावेळी मोदींनी लस ही प्रत्येकाची जबाबदारी असून पात्र असणाऱ्या प्रत्येकाने लस घ्यावी, असं आवाहनही मोदींनी केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“सरकार आल्यापासून हवेत गेलेले उद्धव ठाकरेंचे पाय जमिनीवर आले, आनंद आहे”

धक्कादायक! डिस्चार्ज मिळण्याच्या काही तासांपूर्वी कोरोना रुग्णाची रुग्णालयातच आत्महत्या

सराईत गुन्हेगारांना फेसबुक पोस्ट महागात; पिंपरीतील ‘भाईचा बड्डे’ थेट पोलीस कोठडीत

“मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो”

“मोदी महाराष्ट्रात का आले नाही म्हणता, मग मुख्यमंत्र्यांचा दोनच जिल्ह्यांचा दौरा का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More