नवी दिल्ली | 16 व्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तु्म्ही नरेंद्र मोदींना वाईट म्हणा, भाजपला वाईट म्हणा पण देशाला वाईट म्हणू नका, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
लुटणारांना तुम्ही लुटू पण आम्ही कायदे बनवून वसूली केली, असं नरेद्र मोदींनी म्हटलं आहे. पळून गेलेले लोक 9 हजार कोटींच्या कर्जासाठी 13 हजार कोटींची संपत्ती जप्त केली, असं ट्विटरवरून रडतात, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.
राफेल प्रकरणावर निर्मला सीतारामण यांनी लोकसभेत बाजू मांडली, देशाची वायूसेना दुबळी व्हावी, अशी काँग्रेसची इच्छा होती, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.
दरम्यान, जे मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांना शुभेच्छा देतो, असं म्हणतं युवकांना साद घालण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
–निवडणुकीपूर्वीचं लोकसभेतील नरेंद्र मोदींचं शेवटचं भाषण, वाचा त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
–राज्य सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण घटनाबाह्य; श्रीहरी अणेंचा न्यायालयात युक्तिवाद
–“…जर असं झालं तर नितीश कुमारांना पंतप्रधान करू”
–सुप्रिया सुळे Vs विजय शिवतारे असा सामना रंगणार?; भाजपची शिवसेनेला सूचना
–“…तर मराठा समाज ओवैसींना कोल्हापुरातून परत जाऊ देणार नाही”