बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसचा हा बडा नेता म्हणतो, ‘मोदींना कोट्यवधी मृत्यूंचं सोयरसुतक नाही, नितीन गडकरी पंतप्रधान हवेत’

मुंबई | कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत असताना कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोना उद्रेकामुळे कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. तसेच केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे.

कोरोना परिस्थितीवरून केंद्र सरकावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवे होते, असं नाना पटोले यांनी म्हटलंय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

देशभरात कोरोनामुळे कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचं सोयरसुतक नाही. त्यामुळे नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवे होते, असं नाना पटोले म्हणाले. तसेच आम्हला आनंद आहे की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय. मी नितीन गडकरी यांच्याविरोधात लढलो त्यावेळी त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून मतं मागितली होती. म्हणून आनंद आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौरा करत आहेत. मात्र चक्रीवादळाने महाराष्ट्रातही नुकसान झालं आहे. त्यांनी महाराष्ट्रातही यायला पाहिजे होतं. प्रशासनावर ताण येऊ नये म्हणून त्यांची भूमिका असेल तर ती चांगली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कंट्रोलरुममधून परिस्थिती हाताळत आहेत. प्रशासनावर ताण नको म्हणून आम्हीही उशिरा बाहेर पडत आहोत, असं नाना पटोले यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

फरार विजय माल्याची मालमत्ता आता SBI विकू शकणार; माल्याकडे 14 हजार कोटींची थकबाकी

कमरेला पदर खोचून आजीबाईंचा परफेक्ट बोलिंग नेम; पाहा व्हिडीओ

दैव बलवत्तर! भलंमोठं झाड कोसळल्यानंतरही वाचली महिला; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

शरद पवारांचा सदानंद गौडा यांना पत्राद्वारे शाब्दिक टोला; म्हणाले…

निवृत्त झालेला Mr.360 पुन्हा मैदानात?; पुनरागमनाबाबत डिव्हिलियर्सने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More