नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींची माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत नाही, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. ते लोकसभेत बोलत होते.
मोदी सरकार विरोधात आज अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. यावर बोलताना राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मी एवढी टीका आणि आरोप केले आहेत त्यामुळे मोदींची माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहायची हिंमत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, मित्रांच्या खिशात पैसा जावा म्हणून मोदी भारतात पेट्रोलचे दर वाढवत आहेत. तसंच मोदी चौकीदार नसून भागीदार आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या बातम्या–
-नरेंद्र मोदी सरकारला इशारा नाही शाप देतो!
-वल्लभभाईंचा पुतळा मोठा करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली!
-मराठा आरक्षणावरून मोर्चेकरी आक्रमक; एसटी बसची तोडफोड
-नागपूरमध्ये अधिवेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी विदर्भवासियांच्या तोंडाला पानं पुसली!
-सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची खडाजंगी; सभापतीही वैतागले