बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून मोदी चहामध्ये साखर देखील घेत नाहीत’; औवैसींचा घणाघात

हैदराबाद | जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीमुळे देशभरातून अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस तसेच इतर विरोधीपक्षाने देखील केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. अशातच आता एआयएमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन औवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनवर बोलायला नेहमीच घाबरतात, त्यामुळे चीनचा उल्लेख होऊ नये म्हणून मोदी चहामध्ये साखरही टाकत नाही, अशी खोचक टीका औवैसींने केली आहे. यावेळी बोलताना, मोदी कधीच दोन गोष्टींवर बोलत नाहीत त्या म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि चिनी सैन्याची भारतात घुसखोरी, असं देखील औवैसी म्हणाले आहेत.

आपल्या भाषणात बोलताना आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या मात्र मोदी म्हणातात ‘मित्रों फिकर मत करो’, असा टोला असदुद्दीन औवैसी यांनी लगावला आहे. तसेच पाकिस्तानने पुलवामावर हल्ला केल्यानंतर त्यांना घरात घुसून मारणार, असं मोदी म्हणााले होते, मात्र त्यांनी काहीच केलं नाही याची आठवण देखील औवैसींनी करुन दिली आहे.

दरम्यान, पाकिस्तानकडून दहशतवादी, शस्त्रे येत आहेत. आपण सीजफायर केले मात्र तरी ड्रोनमधून शस्त्रे येत आहेत. काश्मीरमध्ये ज्याप्रकारे टार्गेट किलिंग होत आहे त्याला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे कोणतेही धोरण नाही, असा आरोप देखील औवैसी यांनी यावेळी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

विमानाचा रंग पांढराच का असतो?, ‘हे’ आहे त्यामागचं विशेष कारण

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी राहणार पाणीपुरवठा पुर्णपणे बंद

धावत्या रेल्वेतून गरोदर महिला पडली खाली, देवदूतासारखा धावून आला RPF जवान, पाहा व्हिडीओ

“हा केवळ योगायोग आहे की, मुख्यमंत्र्यांचं इटलीसोबतच लांगुलचालन?”

आर्यन खानच्या सुटकेसाठी ‘या’ शिवसेना नेत्याची थेट सर्वोच्च न्यायालयात धाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More