…तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील!

कोल्हापूर | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे पुढील निवडणुकीत मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील, असं काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ते कोल्हापूरात बोलत होते.

नोटाबंदी, राफेल करारावरून सुरू असलेली टीका, आरबीआय आणि सीबीआयमधील वाद आणि कोलंडलेली अर्थव्यवस्था यामुळे देशात सगळीकडे अस्वस्थता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत देशपातळीवरील चेहरा बदलल्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पर्याय नसेल, असं ते म्हणाले.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस आघाडीचे घटक असतील. त्यांनी कुणाशी आघाडी करावी हा त्यांचा प्रश्न असून काँग्रेसच्या व्यासपीठावर मात्र एमआयएमला स्थान नसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक!

-अनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त

-ऑनलाईन पेमेंट करणं आता आणखी महाग होणार?

-नरेंद्र मोदींची डोकेदुखी वाढली; गुजरात दंगल प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

-मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस?