बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आम्ही एका महान खेळाडूला गमावलं’; मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर मोदींनी व्यक्त केलं दु:ख

नवी दिल्ली | भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खासिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे आपण महान खेळाडूला मुकलो आहोत, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांच्यासारखं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाणं हे फार दुख:द आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

करोडो भारतीयांच्या हृदयात ज्यांनी हक्काचं स्थान मिळवलं होतं. ते मिल्खा सिंग आपल्यात राहिले नाहीत, त्यांच्या निधनाने मी दु:खी आहे. काही दिवसांपूर्वी मी मिल्खासिंगजी यांच्याशी चर्चा केली. हे आमचं शेवटचं संभाषण होईल असं मला वाटलं नव्हते. त्यांच्या आयुष्याच्या प्रवासामधून बरेच अॅथलीट्स धडे घेतील, शिकतील. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आणि जगभरातील अनेक चाहत्यांविषयी माझ्या संवेदना व्यक्त करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 30 मे रोजी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मिल्खा सिंग यांच्या शरिरातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्यांना पीजीआयएमआर नेहरु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

थोडक्यात बातम्या- 

“शिवसेना शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालते, शिवसैनिक भगिनीवर वार करणार नाहीत”

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचं कोरोनाने निधन!

आनंदाची बातमी! राज्याचा रिकव्हरी रेट वाढला, वाचा आजची आकडेवारी

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

मोठी बातमी! पुण्यात पुन्हा लॉकडाऊन, महापौरांनी ट्विट करत दिली माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More