देश

“मोदींनी पक्ष्यांना दाणे खायला घातल्याने पक्षी बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले”

नवी दिल्ली | देशभर कोरोनाच्या साथीने थैमान घातलेले असतानाच आता त्यात बर्ड फ्लूची भर पडली आहे. तसेच बर्ड फ्लूवरुन राजकारण सुरू झालं आहे.

समाजवादी पक्षाचे नेते आय. पी. सिंह यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो ट्विट करुन बर्ड फ्लूवरुन जोरदार निशाणा साधला आहे.

आय. पी. सिंह यांनी नरेंद्र मोदी मोराला दाणे खायला घालत असतानाचा फोटो ट्विट केला आहे. तसेच या माणसाचं काय करावं?, पक्ष्यांना दाणे खायला घातले आणि पक्षी बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले, असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, देशातील केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात या सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव झाला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

पुण्यात अपघातांचं सत्र सुरुच, सकाळपासून एकापाठोपाठ चार अपघात

चेंडू छेडछाडीनंतर हे वाईट कृत्य करताना स्मिथ सापडला रंगेहात; पाहा व्हीडीओ

पंचांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार पेनला आयसीसीने दिला झटका!

खळबळजनक! नालासोपाऱ्यात घराबाहेर पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला उचलून तिच्यावर बलात्कार

सीरम इंस्टिट्यूटचा मोठा करार; फिलीपींस सरकारला इतक्या कोटी कोविशिल्ड लसीचा पुरवठा करणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या