“बाळासाहेबांची ती इच्छा मोदींनी पूर्ण केली”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिंदेंच्या बंडानंतर बाळासाहेब ठाकरेंची(Balasaheb Thackeray) सोमवारी पहिलीच जयंती आहे. यानित्तानं ठाकरे(Uddhav Thackeray) आणि शिंदे(Eknath Shinde) गटाकडून बाळासाहेंबाच्या आठवणीला उजाळा दिला जात आहे.

यानिमित्तान शिंदे गटाचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर(Deepak Kesarkar )यांनी बाळासाहेबांबद्दल बोलताना ठाकरे गटाला टोला लगावला आहे. लोकांनी निवडूण दिलेल्या युती शासनाच्या विचारांपासून आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदूत्वापासून दूर गेलेल्यांनाच मदतीची गरज आहे, असं ते म्हणाले.

बाळासाहेबांची इच्छा मोदींनी(Narendra Modi) पूर्ण केली आहे. युतीच्या विचारांबरोबर, हिंदुत्वाच्या विचारांबरोबर राहवं, अशी आम्ही मागणी केली होती. परंतु त्यांनी विचारधाराच सोडली, असं म्हणत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

एक दिवस मला पंतप्रधान करा, कलम ३७० मी रद्द करतो, असं बाळसाहेब म्हणायचे. त्यानंतर मोदींनी हा निर्णय घेत कलम 370 रद्द केले. त्याच काश्मीरमध्ये जाऊन काॅंग्रेसच्या नेत्यांना मिठी मारणं हा बाळासाहेंबाचा मोठा अपमान आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, कुणाबरोबरही युती केली म्हणून जनता सोबत राहत नाही. जनता विकासाबरोबर राहते, असंही ते म्हणाले. एकंदरीत त्यांनी ठाकरे गटाला चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-