अदानीच्या घोषणांवर मोदी संतापले, विरोधकांना झाप झाप झापलं
नवी दिल्ली | लोकसभेनंतर राज्यसभेत देखील विरोधकांचा गोंधळ पहायला मिळालं. राज्यसभेत भाषण (Speech) करत असतांना विरोधी बाकावर असलेल्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे भाषण सुरू होताच गदारोळ सुरू केला.
मोदी-अदानी भाई भाईच्या घोषणा देत विरोधकांनी मोदींना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी मोदी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मोदींनी विरोधकांना प्रत्युत्तर देत भाषण सुरू ठेवलं.
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गदारोळ सुरू असतांनाही आपलं भाषण सुरूच ठेवत टोलेबाजी केली आहे. नरेंद्र मोदी यांनी एवढ्या मोठ्या सभागृहातील भाषणावर देशातील प्रत्येकाचं लक्ष असतं. त्यामुळे निराशा होत आहे हे दुर्दैवी असल्याचं मोदींनी म्हटलं.
मी संकटापासून लांब पळणारा माणूस नाही. ज्यांची ग्रामपंचायतपासून संसदेपर्यंत सत्ता होती त्यांनी काही केलं नाही. पण आमच्या सरकारने जगभरात ओळख मिळवली, असं मोदींनी सांगितलं.
जितका चिखल तुम्ही टाकत जाल तितके कमळ उमलत जाईल. आणि तेच कमळ उमलविण्यात तुमची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे तुमचे सर्वांचे आभार मानतो असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना चिमटा काढला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.