बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोकसभा निवडणुकीआधी मोदी-गडकरींचा मेगा प्लॅन, तब्बल ‘इतके’ प्रकल्प हाती घेणार!

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर केंद्र सरकारची प्रतिमा काही प्रमाणात मलिन झाल्याचं पहायला मिळालं. देशात महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे केंद्र सरकार विरोधात नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे आता 2024ची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकार काही प्रकल्प हाती घेणार आहे.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्ली येथे बोलताना 200 प्रकल्प हाती घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. यामुळे ज्याठिकाणी जाण्यास काही तास लागायचे तिथे फक्त काही मिनिटांत पोहचता येणार आहे. हे प्रकल्प 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर लोकांना वापरायला उपलब्ध करणार आहेत. नितीन गडकरींनी दिल्ली- मुंबई एक्सप्रेसवेच्या कामाची आज पाहणी केली.

केंद्र सरकारच्या या प्रकल्पामध्ये 47 कोटींचा दिल्ली-कटरा एक्सप्रेस हायवे हा 572 किलोमीटरचा असणार आहे. यासोबतच मुंबई-दिल्लीतील सर्वांत लांब असणारा 1380 किमीचा महामार्ग 2023 पर्यंत पुर्ण होणार आहे. या महामार्गाचं काम मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने सुरू असून महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांमधून महामार्ग जाणार आहे.

दरम्यान, मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेवर 2-3 स्मार्ट सिटी बनवण्याचा विचार नितीन गडकरींनी व्यक्त केला आहे. नितीन गडकरी नेहमी आपल्या खात्यातील अधिकाऱ्यांकडून काम वेळेत पुर्ण करून घेतात. त्यामुळे नितीन गडकरींच्या खात्याचं नेहमी कौतूक होत असतं.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेनेला वाचवायचं असेल तर उद्धव ठाकरेंनी सरकारच्या बाहेर पडायला हवं”

मुंबईचा जगभरात डंका! प्रामाणिकपणाच्या सर्वेक्षणात पटकावला दुसरा क्रमांक

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

सलमान खानला उच्च न्यायालयाची नोटीस; ‘या’ प्रकरणामुळे रहावं लागणार हजर

‘या’ कंपनीला आले सोन्याचे दिवस, एका दिवसात विकल्या इतक्या कोटींच्या स्कूटर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More