Loading...

मोदी प्रचाराला महाराष्ट्रात… अन् ट्विटरवर #मोदी_परत_जा टॉप ट्रेंडमध्ये!

मुंबई |  आज सुपर संडे असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, योगी आदित्यनाथ असे भाजपचे दिग्गज नेते महाराष्ट्रात प्रचाराला आले आहेत. मात्र नेटकऱ्यांना पंतप्रधान मोदींचं महाराष्ट्रात येणं आणि त्यांच्या प्रचाराचे मुद्दे काही भावलेले दिसत नाहीत. म्हणूनच नेटकऱ्यांनी #मोदी_परत_जा असा हॅशटॅग ट्वीटरवर सुरू केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महाराष्ट्रात पहिली सभा जळगावमध्ये तर दुसरी सभा भांडाऱ्यात पार पडली. पहिल्या सभेत त्यांनी कलम 370 वरून घणाघाती भाषण केलं तसंच शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली तर दुसऱ्या सभेत त्यांनी केंद्र सरकारच्या कामाचा पाढा वाचला.

Loading...

मोदी परत जा… महाराष्ट्रात मोदींना नो एन्ट्री… फक्त निवडणुकीपुरतंच महाराष्ट्रात येणाऱ्या मोदींचा निषेध अशा आशयाचे ट्वीट नेटकऱ्यांनी केले आहेत. #मोदी_परत_जा या हॅशटॅगने आत्तापर्यंत 45 हजार ट्वीट झाले आहेत.(सायं. 6 वाजून 30 मिन.)

दरम्यान, विधानसभेच्या प्रचारात काँग्रेसच्या तुलनेत मोदींनी मोठी आघाडी घेतली खरी पण त्यांना नेटकऱ्यांच्या रोषाला आज सामोरं जावं लागलं आहे.

Loading...

 

 

Loading...

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Loading...