Top News महाराष्ट्र सांगली

आटपाटीच्या बाजारात विक्रीला आला ‘मोदी बकरा’; किंमत ऐकाल तर हैराण व्हाल!

सांगली | सांगलीतील आटपाडीमधील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त रविवारी आयोजित जनावरांच्या बाजाराला मोठा प्रतिसाद मिळाला. या बाजारात मेंढ्या व इतर जनावरांसोबत तब्बल दीड कोटी रुपये दर असलेला बकरा विक्रीसाठी दाखल झाला होता. मोदी बकरा असं या बकऱ्याचं नाव होतं.

सांगली तालुक्यातील चांडोलवाडी येथील मेंढपाळ बाबुराव मेटकरी यांनी दीड कोटींचा मोदी बकरा बाजारात विकण्यासाठी आणला होता. या बकऱ्याला बाजारात 70 लाखापर्यंत मागणी झाली.

मोदी बकऱ्यासाठी मेटकरी यांना दीड कोटी रुपये मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती किंमत न मिळाल्याने शेवटी त्यांनी बकरा विकणार नसल्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, कोरोनामुळे आटपाडी कार्तिक पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आली होती, त्याऐवजी फक्त जनावरांचा बाजार रविवारी आणि सोमवारी भरविण्यात येणार आला.

महत्वाच्या बातम्या-

अर्जेंटीना फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूची होणार चौकशी

उर्मिला मातोंडकर शिवसेनेत करणार प्रवेश; उद्या घेणार पत्रकार परिषद

तिसऱ्या वनडे पूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का; 2 प्रमुख खेळाडू संघाबाहेर

भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचं कोरोनामुळे निधन

विद्यार्थ्यांमधील गणित, विज्ञानाची भीती घालवा; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शिक्षकांना सूचना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या