भाजपला मोठा झटका; मोदी सरकारमधील हा मंत्री काँग्रेससोबत जाणार???

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मोदी सरकारमधील मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी काँग्रेससोबत जाण्याची तयारी सुरु केल्याचं कळतंय. 

उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष राष्ट्रीय लोकसमता पार्टी भाजपसोबत केंद्रात सत्तेत आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन कुशवाह भाजपविरोधात नाराज आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या आधी कुशवाह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. त्यानंतरच ते काँग्रेसोबत जाणार की नाही ते कळेल. 

दरम्यान, निवडणूक जवळ येताच भाजपला राम मंदिराचा मुद्दा सुचला का?, अशा शब्दात त्यांनी नुकतीच भाजपवर टीकेची झोड उठवली होती. 

महत्वाच्या बातम्या-

-शेतकरी आक्रोश करत आहे, हे राज्य कारभारास लांच्छन- उद्धव ठाकरे

-…म्हणून गायक मिका सिंगला दुबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

-मेगाभरतीला धनगरांचा विरोध; आधी धनगरांना एसटी प्रवर्गाचे दाखले द्या!

-…याचाच अर्थ मनोहर भिडेच सरकार चालवतात- धनंजय मुंडे

-भाजपला जोरदार झटका; हिरे पिता-पुत्राची घरवापसी