नोटाबंदीनंतर आता मोदी सरकार चेकबुकवर बंदी घालणार?

नवी दिल्ली | नोटाबंदीनंतर आता मोदी सरकार आणखी एक मोठं पाऊल टाकण्याच्या विचारात असल्याचं कळतंय. चेकबुकच्या वापरावर बंदी येण्याची शक्यता आहे.

कॉन्फिड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे प्रवीण खंडेलवाल यांनी तशी शक्यता व्यक्त केलीय. डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकार हे पाऊल उचलू शकतं, असं त्यांचं मत आहे. 

दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयानंतर व्यापाऱ्यांनी डिजीटल व्यवहार करणं अपेक्षीत होतं. मात्र तसं न होता चेकबुकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. सुमारे 95 टक्के व्यवहार चेकनं होत असल्याची माहिती आहे.