आम्हाला अडवण्यासाठी महिला कमांडो आणताय ही तुमची कसली मर्दानगी- संजय राऊत
नवी दिल्ली | राज्यसभेत बुधवारी विविध विधेयकांवर चर्चा करत असताना मोठा गदारोळ झालेला पहायला मिळाला. काल राज्यसभेत 127 वी घटना दुरुस्ती विधेयक मांडलं गेलं. यावर तब्बल 6 तास चर्चा झाली. त्यानंतर राज्यसभेच्या पटलावर विमा सरंक्षण विधेयक आणलं गेलं अन् गोंधळ झाला.
ईएसबीसी आरक्षण बिलावेळी सर्वांनी मदत केली पण अचानक हे इंन्शुरन्स बिल पटलावर का आणलं गेलं. विमा कंपन्यांचं खाजगीकरण हे देशाला मान्य नाही पण सभागृह नेते पियुष गोयल यांनी हे बिल रेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा सर्वांनी याला विरोध केला. हे करत असताना आम्हाला अडवण्यासाठी महिला बाऊंसर बोलवल्या गेल्या आणि आमची कोंडी केली गेली. ही तुमची कसली मर्दानगी आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारचा निषेध केला.
मार्शल बोलवणं ही काय नवी गोष्ट नाही पण मर्यादा असतात की नाही. प्रताप बाजवा यांनी रुल बुक फेकलं ते योग्यच होतं. सरकार जर नियम मोडत असेल तर हे घडणारच होतं. विमा विधेयकाला विरोध करताना मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार हे पण उभे राहिले पण सरकारने विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम केलं आहे.
शिवसेनेचे खासदार कधी वेलमध्ये जात नाहीत पण काल अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी वेलमध्ये गेले कारण सरकार त्यांचं म्हणणं नव्हतं ऐकत. हे खासदार लोकहितासाठी भांडत होते. तुम्हाला त्यांच्यासमोर महिला बाऊंसर आणताना लाज नाही का वाटली, असा संतापजनक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
थोडक्यात बातम्या
मायग्रेनने ग्रस्त असलेल्या लोकांनी ‘हे’ खाऊ नये!
पीएफ खातेदारांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे जमा होणार
“गंगा नदीच्या पाण्यात कोरोना व्हायरस टीकू शकत नाही”
हे वेदनादायक आहे, माझ्या 55 वर्षांच्या कारकिर्दीत हे कधी पाहिलं नव्हतं- शरद पवार
रानडे इंस्टिट्युटचा वाद शिक्षणमंत्र्यांच्या दरबारी; रानडे इंस्टिट्युटला शनिवारी भेट देणार
Comments are closed.