बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंधन दर स्वस्त करण्यासाठी ‘हा’ आहे मोदी सरकारचा ‘मास्टर प्लान’

नवी दिल्ली | महागाई गगनाला भिडली असताना सतत होणारी इंधनवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने (petrol-diesel price) शंभरी पार केल्याने महागाईची झळ तीव्रतेने बसत आहे. पण महागाईचा फटका बसत असताना सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गगनाला भिडलेले इंधनाचे दर (fuel price) कमी होण्याची शक्यता आता बोलली जात आहे.

कच्च्या तेलाच्या 50 लाख बॅरलचा साठा मोदी सरकार खुला करणार आहे. तर या संबंधीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयाची लवकरच घोषणा होण्याचीही शक्यता आहे. जगभरातील इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे महागाई देखील वाढली आहे. सतत होणारी इंधन दरवाढ जगभरातील देशांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे दरवाढीवर उपाय म्हणून राखीव साठा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारकडे असलेल्या कच्च्या तेलाच्या राखीव साठ्याला स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह (strategic petroleum reserve) म्हणतात. तर आपत्कालिन परिस्थितीत इंधनाचा तुटवडा भासू नये, या उद्देशाने सगळ्याच देशात कमी-जास्त प्रमाणात कच्च्या तेलाचा साठा असतो. तर भारताकडे सध्या कच्च्या तेलाचा 38 दशलक्ष बॅरेल इतका राखीव साठा आहे.

दरम्यान, सध्या असलेल्या राखीव साठ्यांपैकी जवळपास 5 दशलक्ष बॅरेल कच्चे तेल हे येत्या सात ते दहा दिवसांत वापरासाठी काढण्यात येणार आहे. देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर तीन ठिकाणी कच्च्या तेलाचा राखीव साठा आहे. तर भारत देश पहिल्यांदाच कच्च्या तेलाचा राखीव साठा वापरासाठी काढणार आहे. तर याबाबतचा अधिकृत निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

महाविकास आघाडीत नाराजीचा सुर; शिवसेना मंत्र्याचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट, वाचा आकडेवारी एका क्लिकवर

“नरेंद्र मोदी सहजासहजी माघार घेणार नाहीत, त्यांनी माफी मागितली म्हणजे…”

अमाप रिटर्न्स देणाऱ्या क्रिप्टोकरन्सीचं काय होणार?, केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

वीजतोडणीचा प्रश्न पेटला, शेतकऱ्यांसाठी आमदाराचा गळफास घेण्याचा प्रयत्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More