Top News देश

मोदी सरकार 80 कोटी लोकांना 2 रूपये किलोने गहू आणि 3 रूपये किलोने तांदूळ देणार

नवी दिल्ली | देशावर सध्या कोरोनाच्या रूपाने आपत्तीजनक परिस्थितीत ओढावली आहे. अशा परिस्थितीत देशातल्या 80 कोटी लोकांना स्वस्त दराने गहू आणि तांदूळ देण्याचा दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. (Modi Goverment will Give 2 rs kg Wheat And 3 rs kg Rice For 80 crore indian)

केंद्र सरकार 27 रूपये किलोचा गहू 2 रूपये तर 37 रूपये किलो दराचा तांदूळ 3 रूपये किलोने देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असल्याची माहिती केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. (Modi Goverment will Give 2 rs kg Wheat And 3 rs kg Rice For 80 crore indian) तसंच सरकारी क्षेत्रांमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनाही सरकार पगार देईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

करोनाशी लढण्यासाठी तीन ते चारच उपाय आहेत. घरातच थांबा, काहीही काम केलं की हात धुवा, ताप, सर्दी, खोकला वाढला तर लगेच डॉक्टरांकडे जा. तसंच सोशल डिस्टसिंग हे मोजकेच उपाय आहेत, असं जावडेकर म्हणाले.

दरम्यान, केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णायामुळे हातावर पोट असणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. गरज पडली तर आणखी काही निर्णय केंद्र सरकार घेईल, असंही ते म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

‘कोरोनाला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा’; अजित पवारांचा साधेपणाने गुढीपाडवा

पोलीस दिसताच पत्नीला सोडून पुण्यातील पतीनं काढला पळ!

महत्वाच्या बातम्या-

महाभारताचं युद्ध 18 दिवसांत जिंकलं, कोरोनाचं युद्ध 21 दिवसांत जिंकायचंय- नरेंद्र मोदी

प्लीज पप्पा… बाहेर जाऊ नका बाहेर कोरोना आहे; लहानग्या चिमुकल्याची पोलिस बापाला आर्त साद

मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार सुरूच; मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांना पोलिसांनी पकडलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या