बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित डीए मोदी सरकार लवकरच काढू शकतो, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून व्यक्त केली जात होती. केंद्र सरकारने राज्यसभेत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मोदी सरकारने (Modi Goverment) महागाई भत्त्याबाबत निर्णय घेत केंद्रीय कर्माऱ्यांना मोठा धक्का दिला आहे.

मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) यात वाढ करत सुधारणा करण्यासाठी साफ नकार दिला आहे. महागाई भत्त्यात 3 टक्क्यांहून अधिक वाढ करण्याची गरज नसल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Pankaj Chaudhari) म्हटले आहेत.

महागाईच्या आधारावर महागाई भत्ता आणि महागाई दिलासा यात वाढ केली जाईल, असंही मोदी सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर गेल्या दोन तिमाहित महागाईचा दर 5 टक्क्यांहूनही अधिक असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 31 टक्के महागाई भत्ता दिला जातो. महागाई भत्त्यात वाढ झाली असती तर 50 लाखांपेक्षाही जास्त केंद्रीय कर्मचारी व 65 लाखांहूनही जास्त पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा झाला असता. देशभरातील लाखो कर्मचारी या प्रलंबित डीेएची वाट पाहात होते. मात्र, केंद्रीय कर्मचारी पुन्हा निराश झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या आजचे ताजे दर

मोठी बातमी! जो बायडन यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

होळीच्या दिवशी पांढऱ्या कपड्यांना आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या या मागचं खरं कारण

रशियाला मोठा धक्का, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

रशिया-युक्रेन युद्धावर डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More