नवी दिल्ली | दोन वर्षापूर्वी आलेल्या कोरोनाने जगभर थैमान घातलं. कोरोना काळात अनेकांनी आपला जीव गमावला. अनेक मुलांनी डोक्यावरचं आई-वडिलांचं छप्पर गमावलं. या मुलांसाठी भारत सरकारने एका योजनेची घोषणा केली होती.
पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन या योजनेअंतर्गत मोदी सरकारने कोरोनाकाळात आई-वडिलांचं छप्पर गमावलेल्या मुलांना सहाय्य रकमेसह शिक्षण आणि वैद्यकीय विम्याची सुविधा जाहीर केली होती. मुलांना स्वावलंबी करण्यासाठी सरकारने या योजनेची घोषणा केली.
या मुलांना वयाच्या 18 वर्षापर्यंत स्टायपेंड मिळेल, वयाच्या 23व्या वर्षी योजनेतील पात्र मुलांना पीएम केअर फंडातून एकाच वेळी 10 लाख रूपये मिळणार आहेत. या मुलांना सरकार मोफत शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी देईल ज्याचं व्याज पीएम केअर फंडातून दिलं जाणार असल्याचंही सरकारने जाहीर केलं होतं.
दरम्यान, सरकारने या योजनेच्या नोंदणीची तारीख 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. 11 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत आपले दोन्ही किंवा एकमेव पालक गमावलेले मुलं या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र, या मुलांचं वय 18 वर्षांच्या आत असणं बंधनकारक आहे.
थोडक्यात बातम्या-
“आता जीव गेला तरी चालेल पण भाजपला सोडणार नाही”
कोण म्हणतं चाट खाऊन वजन कमी करता येत नाही?, मग हे ‘चाट’ एकदा खाच
“समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफजलखानी वार सुरू”
“ईडीला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या शिवाजी पार्कात”
‘या’ भागात पुन्हा हलक्या सरींची शक्यता, हवामान खात्याचा इशारा
Comments are closed.