बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता मिळणार बिनव्याजी कर्ज, मोदी सरकारने आणली ‘ही’ भन्नाट योजना

नवी दिल्ली | मोदी सरकारने देशातील जनतेसाठी विनातारण आणि बिनव्याजी अशी भन्नाट योजना आणली आहे. शिवाय या योजनेअंतर्गत वेळेत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजावर सात टक्के अनुदान देखील देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत देशातील फेरीवाल्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. देशातील जवळपास 50 लाख फेरीवाल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

फेरीवाल्यांना या योजनेअंतर्गत एका वर्षासाठी 10 हजार रूपये खेळते भांडवल म्हणून उपलब्ध करून दिले जाणार आहे. जर या योजनेच्या लाभार्थ्यांनी डिजिटल व्यवहार केला तर त्यांना बाराशे रूपये कॅशबॅक देखील मिळणार आहे.

pmsvanidhi.mohua.gov या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर कर्ज प्राप्त करण्यासाठी लिंक मिळणार आहे. याच वेबसाईटवर सरकारने शिफारस पत्र उपलब्ध करून दिले आहे. यासोबतच अर्ज करण्यासाठी वापरलेला मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्डसोबत लिंक असणे अनिवार्य आहे.

थोडक्यात बातम्या-

“त्याच्यातला कलावंत उमगला”, नितेश राणेंच्या ‘म्याँव-म्याँव’वर नारायण राणेंची प्रतिक्रिया

दोघांच्या संमतीनं केलेलं सेक्स बलात्कार ठरु शकतो का?; न्यायालयानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय

‘दिशा सालियनवर बलात्कार झाला तेव्हा फ्लॅटबाहेर मंत्र्याचे…’, राणेंचा खळबळजनक दावा

“जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहे तोपर्यंत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही”

“…पण आज शिवसेनेचे पक्षप्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर उठलेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More