मोदी सरकारचं चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांना मोठं गिफ्ट; दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा

Modi Government 3.0 First Budget | देशात एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 23 जुलैरोजी सरकारचा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. दोन्ही नेत्यांच्या (Modi Government 3.0 First Budget) राज्यांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पामध्ये या दोन्ही राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. आंध्रप्रदेशला अतिरिक्त 15 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंध्र प्रदेशमधील पोलावरम सिंचन योजना पूर्ण करण्याची ग्वाहीही अर्थसंकल्पातून चंद्राबाबूंना देण्यात आली आहे.

आंध्रप्रदेशला अतिरिक्त 15 हजार कोटी रुपये

तर बिहारमध्ये एक्सप्रेस वे बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे.बिहारमध्ये रस्ते बांधणीवर भर दिला जाणार असून पटना-पूर्णिया एक्सप्रेसवे, बक्सर-भागलपूर राजमार्ग, बुद्धगया-राजगीर-वैशाली-दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर पूल बांधण्यासाठी 26 हजार कोटी रुपये दिले जाण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

तसेच तसेच बिहारमध्ये मेडिकल कॉलेज (Modi Government 3.0 First Budget) स्थापन करण्यात येणार असल्याची देखील घोषणा करण्यात आली आहे. सुमारे 21 हजार 400 कोटी रुपये खर्चून बिहारमध्ये ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये पिरपेंटी येथे 2400 मेगावॉटचा नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. नवीन विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालयांसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे.

बिहारसाठी 26 हजार कोटींची तरतूद

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील रोजगार वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. संघटित क्षेत्रात प्रथमच कामाला लागणाऱ्या तरुणांना प्रोत्साहनपर भत्ता मिळणार आहे. याचे बँक खात्यात तीन टप्प्यांत थेट पैसे जमा केले जातील. या योजनेनुसार नवीन नोकरदारांना 15 हजारापर्यंतचा प्रोत्साहनपर भत्ता म्हणजेच Incentive मिळेल. मात्र, यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. महिन्याला 1 लाख पेक्षा कमी वेतन असणारे नोकरदार या (Modi Government 3.0 First Budget) योजनेसाठी पात्र असतील. हे पैसे EPFO खात्यात जमा होतील.

याचबरोबर कृषी क्षेत्रासाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले जाणार कृषी उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर असणार आहे.शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाईल. त्यातून शेतीपिकांंचं सर्वेक्षण, मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल.

News Title –  Modi Government 3.0 First Budget

महत्त्वाच्या बातम्या-

तरुणांसाठी खुशखबर! पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना मिळणार 15000 रुपयांचा भत्ता, पैसे येणार थेट खात्यात

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा, सरकारकडून मोठ्या घोषणा!

केंद्रीय अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग?, सगळ्या घोषणा वाचा एका क्लिकवर

आनंदवार्ता! बजेटपुर्वीच सोनं झालं स्वस्त?, जाणून घ्या आजच्या नव्या किमती

आज ‘या’ राशीच्या व्यक्तींना मोठा आर्थिक लाभ होणार!