पाकिस्तानातून कांदा आयात करण्याचा मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे. त्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. एमएमटीसीच्या या निर्णामुळे नुकसान सहन करावे लागत असल्यामुले राज्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एमएमटीसीकडून वर्षातील ही पहिलीच निविदा काढण्यात आली आहे. ‘एमएमटीसी’कडून 6 सप्टेंबर रोजी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढण्यात आली होती. 24 सप्टेंबरपर्यंत दोन हजार टनसाठी आवेदन मागवले आहे. याची वैधता 10 ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये खरीप हंगामात अपेक्षित कांदा उत्पादन झाले नाही. त्यामुळे देशभरात कांदा महागला आहे. देशभरात सध्या कांद्याची कमतरता आहे. परिणामी कांदा प्रति किलो 50 रूपये झाला आहे.

काही दिवसांमध्ये मुबलक कांदा उपलब्ध होणार असताना इतर देशांतून आयात करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-