“मोदी सरकारने देशद्रोह केला आहे”; राहुल गांधींचे केंद्रावर गंभीर आरोप
नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून पेगासस सॉफ्टवेअरवरून विरोधक केंद्र सरकारवर आरोप करत आहेत. त्यातच पुन्हा एकदा पेगाससमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. अमेरिकेच्या न्युयॉर्क टाई्म्सने पेगासस खरेदीची बातमी छापल्याने भारतीय राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
मोदी सरकारने आपल्या लोकशाहीतील प्राथमिक संस्था, राजकीय नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगासस सॉफ्टेवेअर खरेदी केले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. विरोधक, न्यायपालिका आणि लष्कराचे फोन टॅप करून या सर्वांना टार्गेट केलं आहे. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.
अमेरिकेतील न्युयॉर्क टाईम्सने रिपोर्ट प्रकाशिक केला आहे. त्यामध्ये पेगाससवर सॉफ्टवेअर संदर्भात काही माहिती दिली आहे. केंद्र सरकारकडून 5 वर्षांपूर्वी मिसाईल सिस्टीम डिफेन्स डिलसाठी 20 बिलियन डॉलर म्हणजे 15 हजार कोटी रूपये पॅकेजच्या नावाने इस्त्राईली सॉफ्टवेअर पेगाससची खरेदी केली, असं द न्युयॉर्क टाईम्सने प्रकाशित केलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, भारत सरकारकडून इस्त्राईली सॉफ्टवेअर वापरल्याचं मान्य करण्यात आलं नाही. यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तर भाजपा खासदार सब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. मोदी सरकारने न्युयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टवर स्पष्टीकरण द्यायला हवे, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘या’ नागरिकांना मिळणार स्वस्त दरात पेट्रोल, सरकारची मोठी घोषणा
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…
मोबाईल वापरकर्त्यांसाठी खूशखबर! आता 28 नाही तर ‘एवढ्या’ दिवसांचा असणार रिचार्ज प्लॅन
आता ऑनलाईन परिक्षेतही विद्यार्थ्यांवर राहणार वाॅच, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा मोठा निर्णय
Petrol Diesel Price: जाणून घ्या आजचे ताजे दर
Comments are closed.