देश

मोदी सरकारनं केलं असंघटीत कामगारांना खूश! केली ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकारने आज शेवटचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी आणि कामगारांसाठी अत्यंत महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यापुढे असंघटीत कामगारांना निवृत्ती वेतन मिळणार असून 7 हजार रुपये बोनसची घोषणा करण्यात आली आहे.

यावर्षापासून ‘पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना’ लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 15 हजार मासिक उत्पन्न असणाऱ्या कामगारांना 3 हजार निवृत्ती वेतन मिळू शकते.

प्लंबर, मोलकरीण, शेतमजुर आणि पशुसंवर्धनातील मजुरांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. देशात असंघटित कामगारांमध्ये गरिबीचे प्रमाण जास्त आहे.

दरम्यान, कामगाराचा मृत्यू झाला तर सरकार 6 लाखांपर्यंत रुपयांपर्यंत आर्थिक मदत देणार आहे. ही मदत अगोदर 2.5 लाख इतकी होती.  

महत्वाच्या बातम्या-

-‘ठाकरे’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट; पहिल्या आठवड्यात केली ‘एवढी’ कमाई?

सचिन तेंडुलकरचा मुलगा प्रेमात?? ‘त्या’ तरूणीनं विराट कोहलीलाही केलं होतं प्रपोज!

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! 6.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता पूर्णपणे करमुक्त

-आईसह चार वर्षाच्या चिमुरडीचा गळा चिरुन हत्या

-शेतकऱ्यांपाठोपाठ असंघटीत कामगारांना खूश करण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या