बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी सरकारचे मंत्री विनोदाच्या फुलबाजा पेटवतात मग माचीस, तेल, नोकऱ्या, पगार याचं काय?”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत सामान्य माणसांचं दिवाळं निघण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरोनाचे निर्बंध आता कमी झाल्यामुळे यंदा दिवाळी मोकळ्या वातावरणात साजरी करता येत आहे. पण आता महागाईमुळे खरंच सण साजरं करण्यासारखे वातावरण आहे का? महागाईचा भडका उत्सवांचा उत्साह जाळून टाकत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

मोदी सरकारचे मंत्री विनोदाच्या फुलबाजा पेटवतात. रामेश्वर तेली हे पेट्रोलियम खात्याचे राज्यमंत्री आहेत. त्यांना पेट्रोल आणि डिझेलविषयी विचारल्यावर काय म्हणतात, तर मोदींनी देशभरात मोफत कोरोना लसीची पूर्तता केल्यानं पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. मग तुम्ही मोफत लसीचा भार हा जनतेच्या माथी मारणार आहात का?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित देखील केला आहे.

दरम्यान, सामान्य माणसाची दिवाळी जरी निघत असली तरी राज्यकर्त्या पक्षांची दिवाळी मात्र जोरात चालू आहे, असा टोला देखी राऊतांनी लगावला आहे. पंतप्रधानांच्या सोयीसाठी असे एक विमान असणं ही गरज आहे. पण माचीस, तेल, नोकऱ्या, पगार ही लोकांची चैन झाली आहे, त्याचे काय?, असा सवाल देखील त्यांनी रोखठोक सदरातून विचारला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी छोटा पैलवान आहे, तुम्ही मला इतका सोपा समजू नका”

सकाळी ‘हे’ 4 पदार्थ खा; वजनही कमी होईल आणि होतील फायदेच फायदे

पुण्यात मोठी दुर्घटना! निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 12 जण जखमी

“सेना-भाजपला स्पष्ट बहुमत होतं, तरीही शरद पवारांनी सरकार बनवलं, हा तर…”

“भाजप नेत्यांचे खिसे एवढे मोठे नाहीत की ते आम्हाला खिशात ठेवतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More